सभासदास नम्र सुचना
१) आपला सध्याचा / निवासी पत्ता बदलल्यास संस्थेत लेखी नोंद करावी.२) संस्थेत येताना जलद कामासाठी आपले पासबुक जवळ असू दयावे.
३) आपण वारस नेमला नसल्यास योग्य तो वारस नेमण्याची तजविज करावी.
४) कोणत्याही सभासदाने दोन सभासदापेक्षा जास्त सभासदास कर्जासाठी जमीन राहू नये.
५) आपण संस्थेशी कोणताही आर्थिक व्यवहार केल्यास त्याची पावती त्वरित घेऊन जावी.नंतर
तक्रार चालणार नाही.
६) ज्या सभासदांनी लाभांश घेतलेले नाहीत त्यांनी संस्थेच्या कर्यालायतून त्वरित घेऊन जावेत.
अन्यथा त्यानंतर राखीव निधी मध्ये वर्ग करण्यात येईल.
७) आपण जामीनदार असालतर कर्जदार वेळेवर हप्ते भरतात किवा नाही या बाबत जागृत राहावे
८) संस्थेमधून केवळ कर्ज काढणे एवढाच उद्देश ण ठेवता आपल्या मिळकतीतून स्वत:स
बचतीची सवय लावा. त्यासाठी संस्थेत सभासद ठेव योजना असून त्यावर आकर्षक
व्याजहि दिले जाते.
९) संस्थेचे कामकाज सहकारी कायदे व अधिनियम यांना अनुसरून करावे लागते. तेव्हा
आपल्या व्यवहारासबंधी काही अडचणी असल्यास समजावुन घेऊन सेवक व संचालक
मंडळास सहकार्य करावे.
१०) सभासदांना कर्ज घेते वेळी आपण ज्या कार्यालयात आहात त्या कार्यालयातील आपले पगाराचा
खाते क्रमांक व पासबुकची फोटो प्रत व त्याच खत्याचे दहा चेक देणे बंधनकारक राहील.
११) ज्या सभासदांच्या पाल्यांनी १० वी /१२ वी परीक्षेत ८५ टक्के व त्या पेक्षा अधिक गुण प्राप्त
केले आहेत त्याची नवे तसेच ज्या सभासदांनी व त्यांच्या पाल्यांनी एम.बी.बी.एस/सि.ए/
पी.एच.डी/बी.ई/एम.बी.ए या प्रकारचे उच्चशिक्षण ७० टक्के पेक्षा जास्त मार्क्स घेऊन
उत्तीर्ण केलेले आहे. तसेच शासनाच्या राष्ट्रीय खेळामध्ये प्राविण्य किवां सहभाग प्राप्त केला
असेल अशा सर्व सभासद / पाल्य यांची माहिती सोबत जोडलेल्या फॉर्म मध्ये भरून पाठवावी.
