लेखा परीक्षकाचा अहवाल
मी सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था म.लातूर या संस्थेच्या सोबत जोडलेल्या
३१/०३/२०१५ या दिनांकाच्या ताळेबंदाचे व त्या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या नफा तोटा पत्रकाचे
लेखापरीक्षण केले अहवाल करतो कि,
१. माझ्या लेखापरीक्षणाच्या उद्देशासाठी माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती
सर्व माहिती व खुलासे मला उपलब्ध झाले आहेत.
२. माझ्या मते लेखा पुस्तकाच्या तपासणीतून जितपत दृष्टोत्पतीस येईल त्यावरून संस्थेने
महाराष्ट्र सहकारी संस्थाचा १९६० चा कायदा व त्या खालील नियम संस्थेचे पोट
नियमाने अपेक्षीत असल्याप्रमाणे योग्य ति हिशोबाची पुस्तके ठेवली आहेत .
३. मी तपासलेल्या ताळेबंद व नफातोटा पत्रके संस्थेच्या पुस्तकाशी व विचाराशी जुळत आहेत.
४. माझ्या मते आणि माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे तसेच मला देण्यात आलेल्या खुलाशावरून
हे हिशोब महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा १९६० व त्या खालील नियमान्वये अपेक्षीत
अशा रीतीने आवश्यक अशी सर्व माहिती देतात.
५. ताळेबंदाचे बाबतीत दिनांक ३१/०३/२०१५ ची संस्थेची परिस्थिती सोबतच्या नफा तोटा
पत्रकाच्या बाबतीत त्या दिनांकास संपणाऱ्या वर्षाच्या अगर मुदतीच्या संस्थेच्या नफ्याची
व तोट्याची या अभिप्राय अगर लेखा परीक्षण अहवालात भाग अ,ब,क केलेल्या अवलोकनास
पात्र राहून सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहे.
२०१४-२०१५ या सहकारी वर्षाच्या संस्थेच्या लेखापरीक्षण वर्ग (अ) देण्यात आला आहे.
स्थळ:- लातूर
श्री मनोज एस. बिडवे
प्रमाणीत लेखापरीक्षक
लातूर
