इतिहास
समाजात अर्थकारणाच्या गरजांची पूर्ती करण्याच्या हेतूने वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र येउन सन १९८७ पासून
ते आज पर्यंत उत्तमरीत्या चालवलेली पतसंस्था म्हणजेच सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था होय.
श्री. संदिपान गोविंदराव शिंदे यांनी स्थापन केलेली हि पतसंस्था सातत्याने प्रगती करत असून स्थापणे पासून
दरवर्षी सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळवत आहे. या संस्थेची सुरुवात संस्थापक श्री. संदिपान गोविंदराव शिंदे यांचे
पवित्र वास्तूत झाली. आज संस्थेने सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायम केला आहे. सहकारातील
नियम व अटीच्या अधीन राहून उत्तमरीत्या सहकाराचा विचार सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी वापरण्याचे
सांघिक कार्य कसे करावे याचे सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था एक उत्तम उदाहरण आहे.
