फोन नं. : ०२३८२ - २४१२५२
माननीय अध्यक्षांचे मनोगत
श्री. राजेंद्र कोलगे.
सन्माननीय सभासद बंधू-भगिनी,सर्व ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक
सप्रेम नमस्कार,

आपणाशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे कि सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था म. लातूर स्थापना इ.१९८७ साली झाली
असून २३ ऑगस्ट २०१५ रोजी २८ वर्ष पूर्ण केले आहे. गेली २८ वर्षे आपणा सर्वांच्या सहकार्याने व सहकार कायद्यातील चौकटीत राहून संचालक मंडळाने
यशस्वीपणे काम केले आहे. हे कामकाज करत असताना आजी व माजी सर्व संचालक,पदाधिकारी, सेवक वर्ग, सभासद, ठेवीदार, कर्जदार, जामीनदार,
सहकार क्षेत्रातील सर्व शासकीय पदाधिकारी, सर्व बँका, कायदेविषयक सल्लागार व मुल्यांकनकार इ.संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक यांचे अमुल्य सहकार्य
मिळाले.
सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था राज्यातील एक आदर्श पतसंस्था म्हणून नावारूपास आणू शकलो.कोणत्याही पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये
कर्जवसुली हा महत्वाचा भाग असतो. या कर्जवसुलीकामी प्रवरा पतसंस्थेचे सर्व सभासद, कर्जदार व शासकीय पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांचे
अमूल्य सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच दरवर्षी ९९% पेक्षा जास्त कर्जवसुली करणे शक्य झाले आहे. या प्रवराच्या प्रगतीपथावर माझे
सर्व आजी-माजी सहकारी संचालक, ज्यांची कार्यक्षमता, क्रियाशीलता तसेच निस्वार्थी व निष्कलंक समाजमान्यता यांचे खूप मोलाचे योगदान लाभले
आहे. अहवाल वर्षात अनेक सभासदांनी व त्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात उत्तम यश मिळवले त्या सर्वांचे मी मनापासुन आभार मानतो आणि
आपणा सर्वाकडून अशाच सहकार्याची आशा नम्रपणे व्यक्त करतो.पतसंस्थेच्या कामकाजात, वाढीबाबत आपल्या काही योजना असतील तर त्या जरूर
कळवाव्यात.संचालक मंडळ निश्चितच त्याचा विचार करेल.
या सहकारी वर्षात सहकार कायद्यामध्ये ९७व्या घटना दुरुस्तीमुळे अमुलाग्र बदल झाले आहेत याची माहिती आपणास पत्ररूपाने कळवली आहे. यामध्ये
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभासदांना फक्त शेअर्स घेऊन सभासद राहता येणार नाही तर सभासदांनी संस्थेशी दैनंदिन व्यवहार करून संस्थेने उपलब्ध
केलेल्या सेवांचा फायदा घेतला पाहिजे, संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या पाहिजे, संस्थेकडून कर्ज घेतलेले असले पाहिजे, संस्थेच्या कामकाजाच्या लक्षात आलेल्या
उणीवा संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत म्हणजेच आपण संस्थेचे क्रियाशील सभासद म्हणून संस्थेच्या कामकाजात सहभागी झाले
पाहिजे. याशिवाय इतरही अनेक नियमात बदल झाले आहेत त्याची माहिती आपण घ्यावी. या बदललेल्या आदर्श उपविधीची प्रतमुख्य कार्यालयात उपलब्ध
करून ठेवली आहे.

धन्यवाद....

त्वरित चौकशीसाठी

नाव : पत्ता : आपले कारण :

ई-मेल :
फोन नं :
आपला संदेश :